धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे हिवरखेडा गावाच्या शिवारात शेतातील एका घरात एक इसम बनावट दारू बनवण्याचे साहित्य बाळगून या ठिकाणी बनावट दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून सुमारे 19 लाख 26 हजार 500 रुपये किमतीचा बनावट दारू बनवणे कामे लागणारे साहित्य त्यात स्पिरिट रसायनचे दहा ड्रम, 30 हजार प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, दारूच्या बाटल्यांचे बनावट झाकण, यासह विविध साहित्य जप्त केले आहे.