महाराष्ट्र

नियुक्ती करा नाही तर मनरेगाचे काम तरी द्या

Published by : Lokshahi News

अगदी जेमतेमच्या परिस्थितिमध्ये कुटुंबाचे हातावर पोट असताना व वडिलांनी भंगारचे काम करून मुलाला शिकवलं वर्ष भरापूर्वी राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण करत नायब तहसीलदार पदावर मजल मारली, मात्र तब्बल एक वर्ष उलटूनही शासनाने सेवेत सामावून घेतलं नाही.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा २०१९ मध्ये ४१३ पदाकरिता परिक्षा घेण्यात आली या परीक्षेचा अंतिम निकाल १९ जून २०२० रोजी लागला. वर्ष झाले तरी राज्य सरकारने उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, तहसीलदार व नायब तहसीलदार अशा महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झालेले अधिकाऱ्यांच्या नियुक्ती बाबत सरकार उदासीन का दाखवत आहे असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

तिवसा येथील अक्षय गडलिंग यांनी संघर्ष करून नायब तहसीलदार पदावर मजल मारली, मात्र प्रत्यक्षात त्यांच्या सह कोणाचीही नियुक्ती सरकारने अद्यापही केली नाही, त्यामुळे प्रशासनाने आता आणखी विलंब न करता आम्हाला तात्काळ नियुक्ती द्यावी आम्ही प्रचंड मेहनत घेऊन पाच ते सहा वर्षे अभ्यास करून सरकारी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न पाहिले त्यामुळे सरकारने यातून मार्ग काढावा अशी मागणी अक्षय गडलिंग याने केली.

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news