एटीएम फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठे अपडेट आणले आहे. एसबीआयने आपल्या एटीएम ऑपरेशन्सची सुरक्षा अपग्रेड करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण अपडेट केले आहे. तुम्हाला SBI ATM मधून 10 हजार किंवा त्याहून अधिक पैसे कोणत्याही त्रासाशिवाय काढायचे असतील तर आता तुम्हाला ओटीपी येणार आहे.
एसबीआयचे ग्राहक एटीएममधून 10 हजार किंवा त्याहून अधिक रुपये काढण्यासाठी जातात, तेव्हा बँकेकडून त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जाईल आणि जो ग्राहकाला एटीएम मशीनमध्ये टाइप करावा लागेल.
या प्रक्रियेतून गेल्यानंतरच तुम्हाला एटीएममधून पैसे काढता येतील. यामुळे एटीएम फसवणुकीला आळा बसेल,असा बँकेने दावा केला आहे.