उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांनी आपण काँग्रेस पक्षाची बालिका वधू असल्याचं म्हटलं आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांना प्रश्न विचारण्यात आला की, आम आदमी पक्षाने तुम्हाला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली याप्रश्नावर रावत यांनी उत्तर दिलं की, "मी काँग्रेस पक्षाची बालिका वधू आहे. पक्षाने मला काही दिलं, नाही दिलं तरी मी माझ्या मनातील गोष्ट परखडपणे सांगतो. माझ्या सुरक्षेसासाठी मला कुठे जाण्याची गरज नाही. जेव्हा कधी मी माझ्या नेतृत्वासमोर उभा राहिलो माझी राजकीय सुरक्षा परत मिळाली. त्यामुळे माझा बालिका वधूचा जो स्टेटस आहे, तो मी का सोडेन? फक्त एकदा मुख्यमंत्री होण्यासाठी?".
यासोबतच ते म्हणाले की, "ज्यांनी ही अपेक्षा केली त्यांच्यात अजूनही काही लोक आहेत. त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. पण काँग्रेस पक्ष सोडण्यापेक्षा मी बालिका वधू म्हणूनच स्मशानभूमीपर्यंत जाणं पसंत करेन".