महाराष्ट्र

साताऱ्यात शेकडो युवकांचा ठिय्या; खा. उदयनराजे आंदोलकांच्या भेटीला

Published by : Lokshahi News

प्रशांत जगताप | सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज शेकडोहून अधिक युवक ठिय्या आंदोलन करत आहेत. सैनिक भरती होत नसल्याच्या कारणास्तव या तरूणांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. दरम्यान खा. उदयनराजे भोसले यांनी आंदोलकांची भेट घेतली आहे.

मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन शासनाने सैनिक भरती केलेली नाही. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन देखील परवानगी मिळत नसल्यामुळे या सैनिक भरतीसाठी तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीने मोठ्या संख्येने विद्यार्थी एकत्र येऊन त्यांनी हे आंदोलन केले.

या आंदोलनस्थळी खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट दिली. यावेळी आंदोलकांच्या भरती बाबत सर्व समस्या समजावून घेतल्या.यावेळी आंदोलकांनी शासनाला लवकरात लवकर सैनिक भरती करावी त्याचबरोबर या सैनिक भरती साठी लागणारी वयोमर्यादा दोन वर्षांनी वाढ व्हावी अशी मागणी या आंदोलनात केली आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result