कोल्हापूरच्या द नॅशनल अकॅडमी इंग्लिश मीडिया केंद्रावर आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जिल्ह्यात परीक्षेचा गोंधळ उडाल्याची घटना घडली आहे. आरोग्य विभागाच्या प्रश्न पत्रिका आदला-बदली झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. त्यामुळे परीक्षा परत घेण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.
कोल्हापूरच्या द नॅशनल अकॅडमी इंग्लिश मीडिया केंद्रावर आरोग्य विभागाची परीक्षा घेण्यात आली. या सेंटरमध्ये पर्यवेक्षकांनी आम्हाला आधी प्रश्न पत्रिका दिली आणि त्या पत्रिकेत पोस्ट कोड दुसरा होता. तर विद्यार्थ्यांनी विचारणा केली कि आमचा पोस्ट कोड हा १५ आहे, तर आम्हाला ९ नंबरचा पोस्ट कोड कसा आला. त्यावर पर्यवेक्षकांनी सांगितल कि हा चालतो असा काही नसत. दरम्यान विद्यार्थ्यांनी पेपर लिहण्यास सुरुवात केली. तब्बल ३० मिनिटा नंतर पर्यवेक्षकांच्या लक्षात आल कि हे पेपर चुकीचे आहेत. म्हणजेच ल्याब टेक्निकलची प्रश्न पत्रिका ही स्टाफ नर्सेसला आलेली आहे. मग त्यांनी विद्यार्थ्यांकडून ओएमआर शीट परत घेतली. त्यानंतर त्यांनी १० मिनिटा नंतर विद्यार्थ्यांना डुब्लीकेट उत्तर पत्रिका दिल्या. विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडला आहे का १५ मिनिटात अश्या १०० उत्तर पत्रिका आणतात कुठून. आमची पुन्हा परीक्षा घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली असून. पोलीस घटनास्थळी दाखल झाले.