महाराष्ट्र

Shiv Jayanti 2024: छत्रपतींची जयंती कशी साजरी करणार? या आहेत सूचना

महाराष्ट्राचे आराध्य दैवत तथा मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारी 2024 रोजी 394 वी जयंती साजरी होत आहे.

Published by : shweta walge

महाराष्ट्राचे आराध्य दैवत तथा मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारी 2024 रोजी 394 वी जयंती साजरी होत आहे. वैभव, शौर्य, दया आणि औदार्य यांचे प्रतिक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास 1870 पासून सुरुवात झाली. यानिमित्त यावर्षी शिवजयंती दिवस जिल्हाभर मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमाने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंत्तीनिमित्त राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात यावर्षीची जयंती शासनस्तरावर साजरी करण्यासोबतच विविध सामाजिक संस्था, संघटना, शैक्षणिक संस्थांनी देखील आपल्यास्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करावी.

शिवजयंती ज्या ठिकाणी साजरी होईल, तो परिसर स्वच्छ, सुंदर करावा, कार्यक्रमाच्या ठिकाणी रंग-रंगोटी, विद्युत रोषणाई, रांगोळी काढावी. महाराजांचा पुतळा व परिसर स्वच्छ करावा. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राज्यगीत वाजविण्यात यावे. कार्यक्रमाच्या अगोदर व कार्यक्रमादरम्यान शिववंदना, स्थानिक कलावंतांकडून पोवाडा गायन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील गीत-गायन इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम घेता येत असल्यास अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे. शाळांनी विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, शौर्यगीत स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आदी स्पर्धांचे आयोजन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती