अनंत करमुसे मारहाण प्रकरणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक करुन जामिनावर सोडण्यात आलं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली.
जिंतेद्र आव्हाड यांना अनंत करमुसे मारहाण प्रकरणात अटक करण्यात आलं होतं. तसेच अटक करुन ठाणे पोलिसांनी आव्हाड यांना कोर्टासमोरदेखील हजर केलं होतं. या प्रकरणात कोर्टाने त्यांना तत्काळ जामीन देखील दिला आहे. यासंदर्भात ट्वीट करत किरीट सोमय्या यांनी माहीती दिली.
ठाण्यातला सिव्हील इंजिनिअर तरुणाचे अपहरण करणे, मारहाण करणे या प्रकरणात सव्वा वर्ष आम्ही न्याय मागत होतो, कोर्टाने आज अखेर न्याय दिला.जितेंद्र आव्हाड यांना अटक केली. आता अशा गुंड मंत्र्यांला मंत्रिमंडळात ठेवता येऊ नये असे विधान किरीट सोमय्या यांनी केले.
आरोप काय ?
जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला घरातून उचलून नेऊन अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर तरुणाने केला केला होता. फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट केल्याने या तरुणाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी उचलून नेऊन मारहाण केल्याचा आरोप या तरुणाने केला होता. यावेळी स्वत: जितेंद्र आव्हाडही त्याठिकाणी उपस्थित होते, असाही दावा त्या तरुणाने केला होता. याच प्रकरणात आव्हाड यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आलेला आहे.