Raj Thackeray- Dilip Walse Patil Team Lokshahi
महाराष्ट्र

Dilip Walse Patil : राज्यातील कायदा संदर्भातबाबत आज गृहमंत्री घेणार बैठक

Published by : Shweta Chavan-Zagade

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray) यांनी औरंगाबाद सभेत (Aurangabad) भोंग्यावरून थेट 4 तारखेचा इशारा दिल्यानंतर गृह विभाग अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) आज (3 मे ) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेणार असून राज्यातील कायदा संदर्भात चर्चा तसंच ईद सण असल्याने राज्यातील आढावा घेतला जाणार आहे.

या बैठकीत महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे गृहमंत्री आज महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. DGP कार्यालयात सकाळी 11 वाजता गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील आणि DGP सह इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यात महत्वाची बैठक होणार आहे.

राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेत भाषण केल्यानंतर राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय आज (3 मे) ईद आहे. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आजच सकाळी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तसेच संपूर्ण राज्यातील संवेदनशील भागांचा आढावा घेणार आहेत. धोक्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्याचा कशाप्रकारे सामना करायचा, कायदा आणि सुव्यवस्था कशी राखायची यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

तसंच औरंगाबादचे पोलिस आयुक्त राज ठाकरेंच्या भाषणाचा अभ्यास करत आहेत. पोलीस राज ठाकरे यांच्या सभेची टेप ऐकणार आहेत. राज ठाकरे यांच्या सभेत किती नियम पाळले आणि किती टाळले याचा आढावा पोलीस घेणार आहेत. त्यानंतर कायदेशीर मत घेऊन काय कारवाई करायची हे ठरवले जाईल. कुठल्याही घटना घडू नये यासाठी आम्ही तयारीत आहोत. वरिष्ठ अधिकाऱ्यांची उद्या मुंबईला बैठक बोलावली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचं उल्लंघन कोणीही करून चालणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दल सक्षम असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha