महाराष्ट्र

Mumbai Hit And Run: मुंबईमधील वरळी परिसरात 'हिट अँड रन'; एक ठार, एक जखमी

Published by : Dhanshree Shintre

वरळी येथे हिट अँड रन अपघाताची घटना घडली आहे. बाजारात मासळी आणण्यासाठी गेलेल्या एका दाम्पत्याला एका चारचाकी अज्ञात वाहानाने धडक दिली. ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे तर तिच्यासोबत असलेला पुरुष गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (7 जुलै) पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली. धक्कादायक म्हणजे वाहन चालकाने आपल्या वाहनासह घटनास्थळावरुन पलायन केले. पोलीस फरार चालक आणि त्याच्या वाहनाचा शोध घेत आहेत.

वरळी येथील प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅट्रिया मॅाल परिसरात हिट अँड रनची ही घटना घडली. वरळी येथील कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा हे कोळी पती-पत्नी दाम्पत्य पूर्वीपासून मासळीचा व्यवसाय करते. नेहमीप्रमाणे मासळी आणण्यासाठी हे दाम्पत्य पहाटेच्या वेळी घराबाहेर पडले होते. मासळी घेऊन परत येताना आणि मासळी लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी दुचाकीवरुन निघाले असता चारकाकी वाहनाने त्यांना धडक दिली आणि हा अपघात घडला. या दाम्पत्याकडे दुचाकीवर बरेच सामान आणि मासे असल्यामुळे दुचाकीला धडक बसताच दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि दोघेही चारचाकीच्या बोनेटवर आदळले. बोनेटवर आदळलेल्या पतीने प्रसंगावधान दाखवत मोठ्या शताफीने बाजूला उडी घेतली. मात्र, महिलेला ही चलाकी करुन बाजूला होता आले नाही. परिणामी तिला गंभीर मार लागला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.

शिंदेंच्या शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहानं आपल्या पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यू कारनं एका महिलेला चिरडलं आणि अपघातानंतर तिथून पळ काढला. पोलिसांकडून आरोपीचा कसून शोध सुरू होता. पोलिसांनी याप्रकरणी मिहीरचे वडील शिंदेंच्या शिवसेनेचे पालघरचे उपनेते राजेश शहा यांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस महिरीच्या मागावर असून त्याचा कसून शोध घेत आहेत.

bigg boss marathi 5 winner marathi: 'बुक्कीत टेंगुळ' डायलॉग फेम सुरज चव्हाण ठरला सीझन ५ चा महाविजेता

Chandrakant Handore | खासदार चंद्रकांत हंडोरेंना अटक करा; माजी खासदार राहुल शेवाळे यांची मागणी

निवडणूक आयोगाच्या निर्देशनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 111 पोलिसांच्या तातडीने बदल्या

CM Eknath Shinde | 'कुणाचा बाप आला तरी...' ; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांवर टीकास्त्र तर लाडक्या बहिणींना केलं 'हे आवाहन'

Devendra Fadnavis on Sharad Pawar | मराठा आंदोलकांच्या मागणीला पवारांचं समर्थन नाही, देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांवर टीका