उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओमध्ये स्फोटकाने भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन प्रकरणात एनआयएच्या हाती नवीन धागेदोरे लागले आहेत. हिरेन यांचा मृत्यू होण्याआधी त्यांनी एका मर्सिडीज कारमधून प्रवास केला होता. या मर्सिडीज कारचा शोध लागला असून या कारच्या डिक्कीची पाहणी एनआयएच्या तपास अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
मनसुख हिरेन यांनी शेवटचा प्रवास केलेल्या मर्सिडीज कारच्या शोधात एनआयए होती. आणि आज अखेर हि मर्सिडीज कार एनआयएने जप्त केली आहे. या कारच्या डिक्कीची पाहणी सुरु आहे. या डिक्कीत काही कपडे आणि अन्य काही वस्तू सापडल्याचं प्रथमदर्शनी पाहायला मिळत आहे. महत्वाची बाब म्हणजे या तपासणीदरम्यान व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं जात आहे. त्यामुळे या कारच्या तपासात एनआयएच्या हाती काय लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.