हिंगोली : हिंगोलीच्या आडगाव फाटा येथे शेतकऱ्यांच्या वतीने महावितरण विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे. हिंगोली जिल्ह्यात वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांची पिके उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. यासह हिंगोली जिल्हात दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी आडगाव फाट्यावर शेतकऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आल आहे. या रास्ता रोको आंदोलनामुळे मोठ्या संख्येने वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतुकीची कोडी निर्माण झाली आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत.