गजानन वाणी | हिंगोली जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग असून जिल्ह्यात मागील 24 तासात 66 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यात 20 मंडळात अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यात सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र आहे.अनके पुलावरून पाणी जात असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील पूर्णा कयाधू नदीला पूर आला असून नदी परिसरातील शेकडो हेक्टर जमिनी पाण्याखाली घेल्याने शेती पिकाच मोठं नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडले आहेत. हिंगोली तालुक्यात 73 मिलिमीटर पडला तर सर्वात जास्त कळमनुरी तालुक्यात 81 मिलिमीटर पाऊस झालाय.
दोघांचा बळी एक बेपत्ता
दरम्यान जिल्ह्यात तीन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे दोन जणांचा बळी गेलाय तर आज सेनगाव तालुक्यातील बन बरडा येथील 35 वर्षीय शेतकरी उद्धव काळे हे शेतात शेळ्या चारण्यासाठी गेले असता पूर्णा नदी पात्रात पाण्याचा अंदाज न आल्याने पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. पोलीस प्रशासन आणि आपत्ती विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे मात्र 24 तास उलटूनही शेतकऱ्याचा शोध लागला नाही.