राज्यात परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी या परतीच्या वापसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. साताऱ्यातही परतीच्या पावसानं दोन दिवसांपासून हजेरी लावली आहे. आज गारांसह पाऊस झाल्यानं सातारकरांची चांगलीच तारांबळ उडाली.
गेल्या दोन दिवसापासून साताऱ्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. आज सायंकाळी विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालीये. परतीच्या पावसानं गारांसह जोरदार हजेरी लावल्यानं सातारा शहर आणि परिसरातील रस्ते तुडुंब भरून वाहत होते.
हवामान विभागाने सोमवारपर्यंत सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून 5 ऑक्टोबर पर्यंत परतीचा पाऊस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शेतातील काढणीला आलेलं सोयाबीन आणि घेवड्याच्या पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.