महाराष्ट्र

Mumbai Rain: मुंबईचा आसपासच्या परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबईच्या आसपासच्या परिसरात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे.

Published by : Dhanshree Shintre

पुढच्या काही तासात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईच्या आसपासच्या परिसरात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. यासह दुपारी 12.23 मिनिटांवर समुद्रात उंच लाटा उसळणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आलेले आहे. त्यामुळे 4.35 मीटर इतक्या उंचीच्या लाटा समुद्रात उसळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. समुद्रकिनारी जाणाऱ्या पर्यटकांना सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाकडणा करण्यात आले आहे.

मुंबईत सकाळपासूनच ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. आज रविवारचा दिवस आहे आणि रविवारी मुंबईकरांनी मोठी गर्दी मरीन ड्राईव्ह परिसरात केलेली पाहायला मिळत आहे. मुंबईत कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. काल मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आले होते.

दरम्यान, मुंबईसह आसपासच्या परिसरात जोरदार ते मुसळधार पाऊस काल पडला. आजही मुंबईत जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी