मागील दोन दिवसांपासून राज्यात पावसाची संततधार कमी झाली असली, तरीही पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टी भार, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर मोठ्या सरी बरसणार असल्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील 24 तासात याची तीव्रता आणखी वाढणार आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील बाष्प पूर्व भागात खेचले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुढील 5 दिवस पावसाची शक्यता आहे.
कोकणाच्या किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग ताशी 40-50 किमी प्रति तास राहण्याची शक्यता आहे. अशातच, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देखील हवामान विभागाकडून करण्यात आल्या आहेत.