महाराष्ट्र

Mumbai Rain Update | मुंबई, ठाणे, पालघर, माथेरानध्ये पुढील काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Published by : Lokshahi News

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने मंगळवारी कोकण, मराठवाडय़ासह नगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात जोरदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाने पुनरागमन केले आहे. मुंबई, कोकणासह मराठवाडय़ात बुधवारी मुसळधारांचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पालघर, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांच्या काही भागांवर तीव्र ढग जमा झाल्याने मुंबईसह उपनगरे, अलिबाग, ठाणे, माथेरान, कल्याण येथे मुसळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच बुधवारी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील काही तासांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत वेगळ्या ठिकाणी मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासोबत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट देखील होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result