केंद्राने नुकतेच दोन डोस मधील अंतर वाढवले होते. दुसरा डोस 84 दिवसांनंतर दिला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी 30 दिवसांतच लसीचा दुसरा डोस घेतला आहे. त्यानंतर, सोशल मीडियातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. यावर स्वत: आरोग्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलंय.
राजेश टोपे यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण देताना सांगितेल, मी 'कोवॅक्सिन' लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार ३० व्या दिवशी दुसरा डोस घेतला. दोन डोसमध्ये सुमारे ८० दिवसांचे अंतर ठेवण्याचा नवा नियम 'कोविशिल्ड' लसीसाठी आहे. 'सुज्ञांस अधिक सांगणे न लगे'…., असे ट्विट राजेश टोपे यांनी करुन टीकाकारांचे तोंड बंद केले.