महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंतांची महत्वपूर्ण सूचना; केवळ पाच सूत्रांचे पालन करा

कोरोना विषाणू प्रादुर्भाव उपाययोजनांची आढावा बैठक झाली आहे. याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी माहिती दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कोरोना विषाणू प्रादुर्भाव उपाययोजनांची आढावा बैठक झाली आहे. या बैठकीबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी माहिती दिली आहे. बीएफ-7 व्हेरियंट जास्त घातक नाही. केवळ पाच सूत्रांचे पालन करावे, असे त्यांनी म्हंटले आहे.

तानाजी सावंत म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात एकूण 132 सक्रिय रुग्ण असून त्यापैकी 22 रूग्णालयात आहेत. राज्यातील कोरोना केसेसचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे. जागतिक परिस्थिती, संभाव्य कोरोना वाढीच्या बाबतीत राज्याची तयारी, लसीकरण इत्यादी विषयांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. प्रत्येक जिल्ह्यातील नोडल अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असतील. नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, सर्वांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

बीएफ-7 व्हेरियंट जास्त घातक नाही. केवळ पाच सूत्रांचे पालन करावे. 60 वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण करावे. मास्कची सक्ती नाही. पण, ज्येष्ठ नागरिकांनी मात्र मास्क लावावे. स्वतःची जेनॉमिक चाचणी करावी. 60 वर्षांवरील आणि 18 वर्षांखालील नागरिकांचे 70 टक्के लसीकरण झाले आहे.

या बैठकीत नव्यानं कोविड टास्कफोर्स तयार करण्याचा निर्णय झाला आहे. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात टास्कफोर्स स्थापन करण्यात आला होते. परंतु, या नव्या टास्कफोर्समध्ये आणखी काही तज्ज्ञ डॉक्टरांचा तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे. बाहेरच्या देशातून येणाऱ्या लोकांचं चाचणी करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 'या' 21 महिला झाल्या आमदार

IPL Mega Auction 2025: पहिला दिवस संपन्न! "हे" स्टार खेळाडू झाले पहिल्या लिलावात मालामाल

चेहर्‍यावर दही लावण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Ajit Pawar : रोहित पवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा म्हणाले...