लोकशाही न्यूज नेटवर्क
पाकिस्तानातील तुरुंगात १८ वर्षांचा काळ व्यथित करून मायदेशी परतेल्या हसीना बेगम यांचे आज वयाच्या ६५ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. हसीना बेगम यांचा दफनविधी औरंगबादमधील पीरगैब कब्रस्थानात करण्यात आला. त्यांना कोणीही वारस नसल्याने नातेवाईक आणि विभागातील नागरिकांनीच त्यांचा दफनविधी केला.
आपल्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी हसीना बेगम या १८ वर्षांपूर्वी पाकिस्तानात गेल्या होत्या. त्यावेळी त्याचा पासपोर्ट हरवला. या कारणामुळे त्यांना तब्बल १८ वर्षांचा काळ तुरुंगात काढावा लागला.
हसीना बेगम या औरंगाबादमधील रशिदापुरातील रहिवासी होत्या. त्यांचा विवाह दिलशाद अहमद यांच्याशी झाला होता. दिलशाद हे उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे रहिवासी होते. त्यांच्या पतीचे नातेवाईक पाकिस्तानात होते. त्यानाच भेटण्यासाठी त्या सन २००४ साली रेल्वेने पाकिस्तानात गेल्या होत्या. त्यांचा पोसपोर्ट लाहोर येथे हरवला. त्यानंतर त्यांना तरुंगात डांबण्यात आले. आपण निर्दोष असल्याचे त्यांनी तेथील कोर्टाला सांगितले होते.
हसीना बेगम यांचे औरंगबादमधील सिटी चौक पोलिस ठाण्याअंतर्गत घर आहे. ही माहिती औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तानात पाठवली होती. त्यानंतर पाकिस्तानने त्यांची सुटका केली होती.