राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रासह आणखी ७ राज्यांतील राज्यपाल आणि पुदुच्चेरीतील उपराज्यपाल यांची नियुक्ती केली आहे. यात महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी सी पी राधाकृष्णन यांची वर्णी लागली आहे. तर महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.