महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

Published by : Lokshahi News

आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीगणरायांच्या चरणी वंदन केलं असून राज्यावरील कोरोनाचं संकट दूर करुन महाराष्ट्राला लवकर कोरोनामुक्त कर, असं साकडं श्रीगणरायांना घातलं आहे. बाप्पांच्या आगमनानं घराघरात आनंद, उत्साह, चैतन्याचं, भक्तीचं वातावरण निर्माण होईल. भक्तिमय वातावरणात साजरा होत असलेला गणेशोत्सव कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन साजरा होईल. श्री गणरायांच्या आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार गणेशोत्सवानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात, कोरोना संकटामुळे गणेशभक्तांनी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव गर्दी टाळून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक जाणीवेतून गणेशोत्सव साधेपणानं साजरा होत असला तरी, आनंद, उत्साह, भक्तीमध्ये जोश कायम आहे. त्यात उणीव नाही.

श्रीगणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकर कोरोनामुक्त होण्यास मदत होईल, असा विश्वास आहे, असे सांगून उपमुख्यमंत्र्यांनी गणेशोत्सव काळात सर्वांनी सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result