गुणरत्न सदावर्तेंच्या पत्नी जयश्री सदावर्ते यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आपण आजवर दिलेल्या सरकारविरोधातील लढ्यामुळेच अडकवलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी आणि तर इतर 109 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच जर काही आढळल्यास पोलीस आणखी कोठडीची मागणी करु शकतील, मात्र जर तसं काही आढळलं नाही तर त्यांना जामीन होईल असं सदावर्तेंचे वकील वासवाणी यांनी सांगितलं.
सदावर्ते यांना जामीन होणार की जेल होणार याचा निकाल काही वेळात लागणार आहे. त्यापूर्वी आता एसटी कर्मचाऱ्यांनी किला कोर्टाबाहेर जमायला सुरुवात केली आहे. सदावर्तेंच्या पत्नी जयश्री सदावर्ते यांनी आज कर्मचाऱ्यांना कोर्टाबाहेर जमायचं आवाहन केलं होतं. त्यानुसससार याठिकाणी कर्मचारी एकत्र आले आहेत.
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामागे नेमकं कोण कोण होतं? या हल्ल्यात फक्त एकटेच नसु शकतात, यामागे नेमकं कोण कोण आहे हे शोधण्यासाठी कोठडी आवश्यक असल्याचं सरकारी वकिलांकडून सांगण्यात येतंय.
घरात घुसून आंदोलन करा असं कधीच म्हटलं नसल्याचं सदावर्ते यांच्या वकिलांकडून सांगण्यात येतंय. सदावर्ते यांनी आंदोलन करा असं म्हटलं होतं, मात्र मुंबईत आंदोलन करा असं कुठेच म्हटलं नाही असा बचावाचा पवित्रा सदावर्ते यांच्या वकीलांकडून केला जातोय. सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते यांनी वकील म्हणून बाजू मांडताना सांगितलं की, आम्ही मराठा आरक्षण, दिलीप वळसे पाटील प्रकरणासारख्या अनेक प्रकरणात सरकार विरोधात लढत असल्याने सरकार रागातून ही कारवाई करत आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्यासह काल अटक करण्यात आलेल्या सर्व 110 जणांची कसून चौकशी करण्यासाठी सदावर्तेंना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे. विशेष सरकारी वकील यांनी यावेळी अनेक प्रश्न उपस्थित केले. शरद पवार यांच्या घरी हल्ला करण्यासाठी गेलेले अनेकजण मद्यधुंद अवस्थेत होते, ते खरंच एसटी कर्मचारी होते का? याची चौकशी करावी लागणार असल्याने कोठडीची मागणी होतेय.
गुणरत्न सदार्ते यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे गंभीर असून, त्यासंदर्भातील तपास करण्यासाठी 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केली आहे. सदावर्ते यांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणामुळेच एसटी कर्मचारी शरद पवारांच्या घरी गेल्याची शक्यता आहे.
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver Oak) या निवासस्थानी काल एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) घुसून आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी चप्पल आणि दगडं भिरकावल्यानं या आंदोलनाला काल वेगळं वळन मिळालं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तपासाची चक्र फिरवत १०७ आंदोलकांना अटक केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्यानंतर पोलिसांनी संध्याकाळी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंचं (ADV Gunratna Sadawarte) घर गाठलं. आंदोलकांनी भडवण्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी गुणरत्न सदावर्तेंना अटक केली. त्यानंतर आज सदावर्तेंना किला कोर्टात हजर करण्यात आलं असून, पुढच्या काही वेळात त्यांना जामीन मिळणार की कोठडी हे स्पष्ट होणार आहे. सरकारी वकील प्रदीप घरत हे या प्रकरणात सरकारी पक्षाची बाजू मांडतायेत, तर सदावर्तेंच्या बाजूने वकील वासवाणी हे कोर्टात बाजू मांडत आहेत.