Gunratna Sadawarte  Team Lokshahi
महाराष्ट्र

Gunratna Sadavarte यांना दोन दिवसांची कोठडी, इतर 190 जणांना...

Silver Oak Attack Case :काल पोलिसांनी केली होती अटक

Published by : Sudhir Kakde

मुंबई : मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver Oak) या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी काल एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) घुसून आक्रमक पद्धतीने आंदोलन केलं. आंदोलकांनी काल चप्पल आणि दगडं भिरकावल्यानं या आंदोलनाला वेगळं वळन मिळालं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तपासाची चक्र फिरवत 100 पेक्षा जास्त आंदोलकांना अटक केली. त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्यानंतर पोलिसांनी संध्याकाळी एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंचं (ADV Gunratna Sadawarte) घर गाठलं. आंदोलकांनी भडवण्याचा आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी गुणरत्न सदावर्तेंना अटक केली होती. त्यानंतर आज त्यांना कोर्टात हजर केलं होतं. कोर्टाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. न्यायधीश कैलास सावंत यांनी हा निकाल दिला आहे. तसेच इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली आहे.

मुंबईतील किला कोर्टात ही सुनावणी पार पडली. यावेळी गुणरत्न सदावर्ते यांच्यासह काल अटक करण्यात आलेल्या सर्व 110 जणांची कसून चौकशी करण्यासाठी सर्वांना 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. सरकारी वकीलांनी यावेळी अनेक प्रश्न उपस्थित केले. शरद पवार यांच्या घरी हल्ला करण्यासाठी गेलेले अनेकजण मद्यधुंद अवस्थेत होते, ते खरंच एसटी कर्मचारी होते का? याची चौकशी करावी लागणार असल्याने कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने त्यांना आज दोन दिवसांची कोठडी सुनावली.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय