प्रशांत जव्हेरी | नंदुरबार : शहादा तालुक्यातील असलोद येथील गणेश माळी हा विद्यार्थी जन्मजात दोन्ही हातानी अपंग असलेल्या गणेश माळीची शिक्षण घेण्याची उमेद आणि जिद्द माध्यमांनी समोर आणल्यानंतर राज्यभरातून विविध सामाजिक संघटना आणि दानशूर व्यक्ती मदतीसाठी पुढे आल्या आहेत. तर शहादा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी भेट दिली असून गणेशच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार घेणार असल्याचे सांगितले. अवघ्या 8 वर्षांच्या गणेशची कहाणी निश्चिचीचं प्रेरणादायी आहे.
नंदूरबार जिल्ह्यातील असलोद गावात राहणारा गणेश माळी जन्मतःच अपंग आहे. परंतु, शिक्षणाची प्रबळ इच्छाशक्ती असणाऱ्या गणेशने आपल्या अफाट जिद्दीने अपंगात्वर मात केलीयं. .अवघ्या 8 वर्षांच्या गणेशची आई ही कौटुंबिक कारणास्तव लहानग्या वयात घर सोडून गेली. गणेशच्या पालन पोषणाची जबाबदारी वडिलांवरचं आहे. विशेष म्हणजे गणेशला दोन्ही हात नसल्याने तो पायाने अक्षर गिरवतोय. पायाने लिलया लिहीण्यासोबतचं, मोबाईलवर गेम देखील तो पायानेच खेळतो. जेवणाचा प्रश्न म्हणाल तर मग याच पायाच्या सहाय्याने अन्न ग्रहण करतो. या कोवळ्या वयातही त्याच्या शिक्षण आणि खेळातील अभिरुचीला गणेशचं अपंगत्वही थांबवू शकलेले नाही.
गणेशचे वडील मोल मजुरी करुन कसाबसा कुटुंबाचा गुजारा करतायत. गणेशला शासन स्तरावरुनच कृत्रिम अवयवांसाठी आणि त्याच्या जीवनाच्या लढाईसाठी मदतीची अपेक्षा त्याचे जवळचे मंडळी केली. यालाच प्रतिसाद देत आता राज्यभरातून गणेशला मदतीचे हात पुढे येत आहेत. तर, राजेश पाडवी यांनी भेट देत गणेशच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य सरकार घेणार आणि गणेशसाठी लागणाऱ्या सर्वच शासकीय सेवांसाठी आपण प्रयत्न करणार आहे. तसेच, गणेशच्या सर्व जबाबदारी घेण्यासाठी अनेक जण पुढे येत असल्याची माहिती राजेश पाडवी यांनी दिली आहे. यामुळे त्याची पुढची वाटचाल आता सुकर होणार आहे.