महाराष्ट्र

बैलगाडा शर्यती होणारच… गोपीचंद पडळकर शर्यती भरवण्यावर ठाम

Published by : Lokshahi News

येत्या 20 तारखेला सांगलीत बैलगाडा शर्यत होणारच असल्याचा विश्वास भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं आहे. तसेच बैलगाड्या प्रति ज्याचं बेगडी आणि नाटकी प्रेम आहे, त्यांचे टराटरा बुरखे  फाडले जाणार असल्याचं पडळकर म्हणाले. सांगलीच्या झरे गावात बैलगाडा शर्यती भरवण्यावर भाजपा ठाम आहे.

बैलगाडावर असंख्य कुटुंब चालतात. त्यांना आधार मिळावा यासाठी येत्या 20 ऑगस्ट रोजी भव्य छकडा बैलगाडीचे आयोजन करण्यात आले आहे. पण या शर्यतीला पोलिसांनी हजारोच्या संख्येने पोलीस फोजफाटा तैनात केला आहे. बैलगाडी विषयी ज्यांनी प्रेम दाखवले त्यांनी हे राजकारण थांबवावे. बैलगाडी शर्यत ही होणारच आणि येत्या 20 ऑगस्टला अनेकांची बुरखे टराटरा फाडले जाणार, असे पडळकर म्हणाले.

Maharashtra Election: 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान, 23 तारखेला मतमोजणी

Kojagari Purnima 2024: कोजागिरी पौर्णिमेला खेळला जाणारा भोंडला नेमका आहे तरी काय? जाणून घ्या...

ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांची प्रकृती अत्यवस्थ; नाशिकच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरु

परळीच्या वैद्यनाथ मंदिराची तोडफोड; माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल

Kojagiri Purnima : कोजागरी पौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये, जाणून घ्या