महाराष्ट्र

‘काका पुतण्यांनी कब्जा केलेली ११३ एकर जमीन मोकळी केली’

Published by : Lokshahi News

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर टीका केली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा अनावरणावरुनही त्यांनी मोठा वाद घातला होता. त्यानंतर, आता जेजुरी मंदिर देवस्थानच्या जमिनीसंदर्भात सर्वोच्च न्यायलयाच्या निर्णयाचे आभार मानत त्यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांवर हल्लाबोल केला आहे.

खंडेरायाच्या जेजुरी गडावर जेजुरी देवस्थानने उभारलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण शरद पवार आणि छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार होते. मात्र, उद्घाटनादिवशीच अचानक पहाटे गोपीचंद पडळकर त्यांच्या कार्यकर्त्यांसह जेजुरी गडावर पोहचले आणि त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पडळकर यांचे कार्यकर्ते आणि जेजुरी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांमध्ये झटापटदेखील झाली. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याचं गोपीचंद पडळकर यांनी जाहीरही केलं. आता, तेथील जमिनीसंदर्भात त्यांनी ट्विट करुन महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल

वंचितची विधानसभेची पहिली यादी जाहीर; पहिल्या यादीत 11 उमेदवारांचा समावेश

Navra Majha Navsacha 2: "नवरा माझा नवसाचा 2" पहिल्याच दिवशी बाप्पाने दिला कौल! पहिल्या दिवशी केली 'एवढी' कमाई

Mumbai: मुंबईतील धारावीत तणावाची स्थिती; शेकडो नागरिक रस्त्यावर, वाहनांची तोडफोड