उदय चक्रधर, गोंदीया
भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील हरदोली गावात शेतकऱ्यांच्या धानाच्या पुजण्याला आज लागून संपूर्ण धन जळून खाक झाले आहे.
हरदोली येथील शंकर बिसने यांनी हलक्या वाणाची धान कापणी करून शेतातच पुंजना (ढीग) तयार करून ठेवला होता. गुरूवारी दुपारच्या सुमारास अचानक पुंजण्याला आग लागली. आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण धान्य जळून खाक झाले. या मुळे शंकर यांना लाखो रुपयाचं नुकसान झाले असून शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहे.
सध्याची राज्यातली परिस्थीती शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना अशी आहे. परिणामी अतिवृष्टी, कर्जाचा डोंगर, सरकार आणि विमा कंपन्यांकडून दुर्लक्ष, या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक आणि मानसिक हेळसांड सहन करावी लागत आहे.