महाराष्ट्रामध्ये एसटी सर्वसामान्य माणसांची जीवनवाहीणी आहे. दिवाळी मध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाश्यांची गर्दी होते, त्यामुळे त्यांची गैरसोय होता कामा नये म्हणून अघोषित संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर रुजू व्हावे, जनतेची एसटीशी असलेली नाळ तुटू देऊ नका, असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहेत. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांसोबत आपण दिवाळीनंतर चर्चा करू असेही परब यांनी सांगितले आहे.
तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमिवर ऑक्टोबर महिन्याचे वेतन हे नोव्हेंबर महिन्याच्या १ तारखेला देण्याचे जाहिर केले होते. त्यानुसार सुधारीत महागाई व घरभाडे भत्त्यासह ऑक्टोबर २०२१ चे वेतन त्याचबरोबर दरवर्षी दिली जाणारी दिवाळी भेट आज सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहेत. आता ८५ टक्के आगारातील वाहतूक ही सुरुळीत सुरु असून उर्वरीत १५ टक्के आगारातील वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे. दरम्यान विस्कळीत वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे". संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने आपापल्या कामावर रूजू व्हावे व दिवाळी सणादरम्यान सर्वसामान्य जनतेची गैरसोय होता कामा नये. अशी माहिती परब यांनी दिली आहे.