महाराष्ट्र

बदलापूरात गॅस गळती; नागरिकांच्या प्रकृतीची चिंता वाढली

Published by : Lokshahi News

मयुरेश जाधव | बदलापूर एमआयडीसीत गॅस गळती झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या गळतीमुळे सर्वत्र गॅसच्या धुराचे लोण पसरले आहे. तसेच नागरिकांच्या प्रकृती संदर्भातील तक्रारी समोर येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलासह स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे.

बदलापूरच्या एमआयडीसीत भागात गॅस गळती झाल्याची घटना घडली आहे. या गॅस गळतीची तीव्रता इतकी आहे कि धुराचे लोण सर्वदूर आकाशात पसरले आहेत. दरम्यान या गॅस गळतीने शिरगाव आपटेवाडी भागात लोकांना ठसका लागणं, डोळ्यांची आग होणं असे त्रास जाणवू लागल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान सध्या स्थानिक प्रशासन व अग्निशमन दल गळती रोखण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे.

भरपावसात फडणवीसांची सभा LIVE: पावसात भिजलो की सीट निवडून येते: फडणवीस

Ravindra Dhangekar Kasaba Peth Assembly constituency: रवींद्र धंगेकर कसबा पेठ मतदारसंघासाठी सज्ज

Latest Marathi News Updates live: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड

Dilip Mohite Patil Khed Aalandi Assembly constituency: दिलीप मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली खेड आळंदी मतदारसंघात विकासाची नवी दिशा

शरद पवार यांचं भरपावसात जोरदार भाषण, पुन्हा करिष्मा घडणार का?