Taxi Team Lokshahi
महाराष्ट्र

पेट्रोल, डिझेल दरवाढीचा मुंबईकरांना फटका, आजपासून उबेरची दरवाढ

Published by : Jitendra Zavar

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरांचा परिणाम सर्वसामान्यांवर दिसून येत आहे. पेट्रोलचे भाव वाढल्याने उबेरने (Uber) मुंबईत (MUMBAI) भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला. आजपासून उबेरकडून मुंबईमध्ये 15 टक्क्यांनी भाडे वाढवण्यात आले आहे. भारतीय तेल कंपन्यांनी (Petroleum companies) जारी केलेल्या नव्या दरानुसार शनिवारी पेट्रोल 80 पैशांनी तर डिझेल 85 पैशांनी महागले आहे. गेल्या १२ दिवसांत ही १० वाढ आहे.

उबर इंडिया (Uber India)आणि दक्षिण आशियाचे सेंट्रल ऑपरेशन्सचे प्रमुख नितीश भूषण यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "उबर मुंबईतील प्रवासाचे भाडे 15 टक्क्यांनी वाढवत आहे. इंधन दरवाढीचा फटका चालकांना बसण्यासाठी भाडेवाढ करण्यात आली आहे. चालकांकडून मिळालेल्या प्रतिक्रियांवरून आम्हाला समजते की इंधनाच्या दरात झालेली वाढ ही चिंतेची बाब आहे. यामुळे दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

वर्षभरात दोनदा भाडेवाढ

गेल्या वर्षभरात उबेरकडून दुसऱ्यांदा भाडेवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी जुलै 2021 मध्ये उबेरने भाड्यामध्ये 15 टक्के वाढ केली होती. त्यानंतर आज पुन्हा भाड्यामध्ये 15 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे मुंबईकर ओला, उबेर यासारखा खासगी वाहतुकीचा उपयोग करतात. त्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का