अमोल नांदूरकर | अकोला : पीक नुकसानीच्या पंचनाम्यात खोडताड प्रकरणी पोलीस ठाण्यात आयसीआयसीआय लोंबार्ड या विमा कंपनी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी कृषी प्रशासनाने अकोल्यात खदान पोलिसात तक्रार केली होती. शेतकऱ्यांची ३ कोटी ९५ लाखांनी फसवणूक केल्याचे समोर येत आहे.
आयसीआयसीआय लोंबार्ड पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधीने पीक नुकसान पंचनाम्यात खोडताड केल्याचा प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला आहे. यासंदर्भात जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी व मूर्तिजापूर कृषी विभाग यांनी पोलिसात तक्रार देखील दिली होती. त्यावरून पोलिसांनी कंपनीच्या जिल्हा व्यवस्थापकासह दहा जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केला आहे.
जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले होते. बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असताना सुद्धा सदर नुकसानीच्या पंचनाम्यात काही ठिकाणी खोडताड झाल्याची बाब निदर्शनास आली होती. याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी व मूर्तिजापूर कृषी विभाग यांनी पोलिसात तक्रार देखील दिली होती. त्यावरून पोलिसांनी कंपनीच्या जिल्हा व्यवस्थापकासह दहा जणांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल केला आहे.
शेतकऱ्यांची ३ कोटी ९५ लाखांनी फसवणूक
शेतकऱ्यांची ३ कोटी ९५ लाखांनी फसवणूक झाल्याचं उघडकीस आले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत तब्बल ३ लाख २० हजार ९४१ शेतकऱ्यांनी २४ कोटी २४ लाखांचा विमा यंदा भरला होता. खोटे पंचनामे (सर्व फॉर्म) तयार करून त्यावर कृषी सहायक यांचे खोटया स्वाक्षरी करून तसेच नुकसानीचे क्षेत्र व टक्केवारी कमी करून अपहार व फसवणूक केली आहे.