मुंबईतील कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीत बोगस लसीकरण झाल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणाची मुंबई महापालिकेने तत्काळ दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर याप्रकरणी आता चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
हिरानंदानी सोसायटीत ३० मे रोजी 390 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते. या लसीकरणानंतर नागरिकांना तपासारखी कुठलीही लक्षणे दिसून आली नाही. सोसायटीमधील सदस्यांना प्रमाणपत्र किंवा कोणत्याही प्रकारचा मेसेज मोंबाईल वर आला नाही. यांनतर नागरिकांनी लसीकरण बोगस झाल्याचा आरोप केला होता. या आरोपाची गंभीर दखल घेत महापालिकेने चौकशीचे आदेश डीएल होते.
पोलिसांनी या सर्व प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आतापर्यंत एकूण चार व्यक्तींना अटक केले आहे. तर एका आरोपीला मध्यप्रदेश मधून घेऊन येत आहे . तर यातील दोन व्यक्ती फरार आहेत. यातील मुख्य आरोपी 10 वी नापास आहे.
दरम्यान आरोपीने लसीकरण करण्यासाठी घेऊन आलेली लस देखील कोणत्याही अधिकृत व्यक्तीकडून विकत घेतले नव्हती असे देखील चौकशीत समोर आले आहे. नागरिकांना प्रमाणपत्र तयार करणारा एक व्यक्ती विविध हॉस्पिटलचा आयडी देखील चोरी करत असल्याची माहिती समोर आली आहे.