महाराष्ट्र

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर; पंचगंगेची पातळी 47 फुटांवर पोहोचली

Published by : Siddhi Naringrekar

सतेज औंधकर, कोल्हापूर

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती गंभीर असल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे पंचगंगेची पातळी ही 47 फुटांवर पोहोचली असल्याची माहिती मिळत आहे. 24 तासांत नदीची पाणीपातळी 3 फुटांनी वाढली आहे.

नदीकाठच्या सखल भागात पुराचे पाणी शिरलं असून नदी काठचे नागरीक सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यातील साडेपाच हजारांवर नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले करण्यात आले आहे.

एका राष्ट्रीय महामार्गासह 80 पेक्षा अधिक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. 94 बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. कोल्हापूरकरांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर यंत्रणा सतर्क, शरद पवारांना Z+ सुरक्षा देण्याचा निर्णय?

Shivsena UBT Candidate List | ठाकरेंच्या शिवसेनेची संभाव्य यादी समोर, पाहा कुणाला मिळू शकते उमेदवारी

VidhanSabha Elections UBT: ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार ठरले! छत्रपती संभाजी नगरसाठी "या" उमेदवारांची नावे आली समोर...

VidhanSabha Elections UBT: ठाकरे गटाकडून अजित पवारांना मोठा धक्का!ठाकरे गटात इनकमिंगला सुरुवात

Satish Chavan: आमदार सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीमधून 6 वर्षासाठी निलंबन