इंदापूर : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निकालात महायुतीचे वर्चस्व दिसून आले आहे. अशातच, इंदापूरमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याच्या कारणातून दोघांनी हवेत गोळीबार केल्याचे समजच आहे. याप्रकरणी पोलिसांनी गणेश शिवदास काटकर यांच्या फिर्यादीवरुन काझडमधील राहुल चांगदेव नरुटे आणि समीर मल्हारी नरुटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ग्रामपंचायत सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्याच्या कारणातून आणि गावात दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने राहुल आणि समीर यांनी शिवीगाळ करून हवेत गोळीबार केला आहे. सोमवारी इंदापूर तालुक्यातील काझड गावात ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वालचंदनगर पोलीस रात्री उशीरा घटनास्थळी दाखल झाले होते. चौकशी अंती वालचंदनगर पोलिसांनी दोघांवरती गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.