सॉफ्ट पोर्नोग्राफी प्रकरणाने नवं वळण घेतलं आहे. त्यामुळे राज कुंद्रांच्या अडचणीत मोठी वाढ होत असताना दिसत आहे. आता कंपनीचे तीन निर्माते आणि गहना वशिष्ठ विरूद्ध मुंबईच्या मालाड मालवानी पोलीस स्थानकात तक्रार FIR दाखल करण्यात आली आहे.
गहना वशिष्ठ अभिनेत्री आणि निर्माती आहे आणि तिने हॉटशॉटसाठी काही दिवसांपुर्वी एक कॉन्टेंट तयार केला. फिर्यादी महिला एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे.
हॉटशॉट्स ऍपसाठी पॉर्न शूट करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला होता. असं अभिनेत्रीने तक्रारीत सांगितलं आहे. या प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी मुंबई पोलिस ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.