एसटी कर्मचारी संपाचा खाजगी प्रवासी ट्रॅव्हल्सकडून फायदा उठवला जात आहे. पुणे, मुंबईसाठी दुप्पट ते तिप्पट दर आकारून प्रवाशांची मोठी लूट खाजगी प्रवासी ट्रॅव्हल चालक करत आहे.
एसटीचे राज्य सरकार मध्ये विलीनीकरण व्हावे या प्रमुख मागणीसाठी आज राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. कोल्हापूर विभागातून साडेपाच हजार पेक्षा अधिक एसटी कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागातील सर्व एसटी सेवा बंद आहे आणि याचा सर्वाधिक फटका आहे तो प्रवाशांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सने मात्र प्रचंड मोठी भाडेवाढ केली आहे. आणि याचा सर्वाधिक फ
टका प्रवाशांना बसत आहे. पुणे आणि मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची मात्र खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून आर्थिक लूट होत आहे. सध्या एसटीतून पुणे जाण्यासाठी 330 रुपये भाडे आकारले जातं तर मुंबईसाठी 590 रुपये भाडं साध्या दराने आकारले जात मात्र खासगी ट्रॅव्हल्स चालकांकडून पुण्यासाठी तब्बल 900 ते 1 हजार रुपये तर मुंबईसाठी पंधराशे ते दोन हजार रुपये इतका भाडं आकारले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठं आर्थिक नुकसान होत आहे. दरम्यान सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.