महाराष्ट्र

अखेर 'त्या' टिकटॉक स्टार लेडी कंडक्टरचे निलंबन रद्द

ऑन ड्यूटी रिल्स तयार केल्याने मंगल गिरी या लेडी कंडक्टरला निलंबित करण्यात आले होते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बालाजी सुवर्से | उस्मानाबाद : कळंबच्या टिकटॉक स्टार लेडी कंडक्टरच्या निलंबन प्रकरणाची राज्यात सध्या जोरदार चर्चा होती. ऑन ड्यूटी रिल्स तयार केल्याने मंगल गिरी या लेडी कंडक्टरला निलंबित करण्यात आले होते. या कारवाईवर सोशल मीडियावर जोरदार आक्षेप नोंदविण्यात आला असून एसटी महामंडळावरही मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. यानंतर अखेर निलंबन रद्द केले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब आगारातील लेडी वाहक मंगल गिरी या सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह आहेत. सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून त्या लोकप्रिय झाल्या होत्या. यातील एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाल्याने महिला कंटक्टर अडचणीत आली आहे. मात्र, त्यांचे वर्तन महामंडळासाठी बदनामीकारक ठरत असल्याचा ठपका ठेवत 1 ऑक्टोबर रोजी गिरी यांना निलंबित करण्यात आले होते. सोबतच वाहतूक नियंत्रक कल्याण कुंभार यांनाही निलंबित करण्यात आले होते मात्र आता दोघांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. यामुळे आता सोशल मीडियावरुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, मंगल गिरी यांना निलंबित करत असताना एसटी महामंडळाने म्हंटले होते की, या लेडी कंडक्टरने बसच्या ड्राइवर सीटवर बसून व्हिडिओ बनविले आहेत. जर वाहन सुरु झाले असते तर अनुचित प्रकार घडला असता त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे वर्तन हे चुकीचे असून त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा येईल असे कुठलेच कृत्य केले नसल्याचे ही विभागीय नियंत्रक चेतना केरवडकर यांनी सांगितले आहे.

Cyclone Dana : ओडिशामध्ये दाना वादळांचं भयानक संकट; ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट

देवेंद्र फडणवीस नितीन गडकरींच्या भेटीला, 10 जागांच्या तिढ्याबाबत चर्चा?

Ravindra Dhangekar on Congress Candidate List | रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर, धंगेकर म्हणाले...

Congress Candidate List 2024: काँग्रेसची पहिली यादी जाहीर

Delhi Mahayuti Meeting | दिल्लीतील चर्चा पूर्ण, उद्या मुंबईत अंतिम चर्चेची शक्यता | Marathi News