भूपेश बारंगे | कॉंग्रेस आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याने भाजप चांगलीच आक्रमक झाली होती. भाजप खासदार रामदास तडस यांनी यावर पत्रकार परिषद घेऊन रणजित कांबळे यांच्या अटकेची मागणी केली होती. मात्र त्यांच्या या मागणीनंतर आता रामदास तडस यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार रणजित कांबळे यांना अटक करण्याची मागणी करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. जमावबंदी असताना कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन करून पत्रकार परिषद आयोजित केल्याप्रकरणी निगराणी पथकान दिलेल्या तक्रारीनंतर रामदास तडस यांच्यासह आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या पत्रकार परिषेदेत भाजपचे खासदार रामदास तडस , जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सरिता गाखरे, महाराष्ट्र भाजप प्रदेश सचिव राजेश बकाने, भाजप जिल्हा अध्यक्ष शिरीष गोडे इतर भाजप नेते उपस्थित होते. रामनगर पोलिस ठाण्यात खासदार रामदास तडस सह इतर जणावर गुन्हा दाखल झाला आहे.
मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली ते चालते का?
मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेतात. पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली.त्यावेळी कलम लागली नाही. पोलिसांवर दबाव आणून ही कलम लावली. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी केली.