पिंपरी-चिंचवडमध्ये काल वाल्हेकर वाडी येथे रात्री 2:30 च्या सुमारास एका लाकडाच्या गोदामाला आणि दुकानाला आग लागली. या लाकडाच्या वखारीला आग लागल्याने मोठे नुकसान झाले. या लागलेल्या आगीत पोटमाळ्यावर झोपलेल्या दोन भावांचा होरपळून मृत्यू झाला. या भीषण आगीत लाकडाची वखार जळून खाक झाली आहे. या घटनेनंतर परिसरत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
ललित अर्जुन चौधरी (21 वर्षे) आणि कमलेश अर्जुन चौधरी (23 वर्षे) या सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. आधी लाकडाच्या वखारीला भीषण आग लागली , त्यानंतर त्याच्या शेजारी विनायक अॅल्युमिनिअम प्रोफाइल डोअर कंपनाला भीषण आग लागली. आगीत पोटमाळ्यावर झोपलेल्या दोघांचा झोपेतच दुर्देवी मृत्यू झाला आहे. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आगीवर पाणी मारून आग पूर्णपणे विझविली.
गोदामाच्या बाजूला असलेल्या निवासी इमारतीमधील सर्व रहिवासांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. आगीचे कारण आगीचे कारण समजू शकले नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 4 अग्निशमन केंद्रातील एकूण 5 अग्निशमन वाहनांसह जवळपास 35 ते 40 अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच प्राधिकरणचे 1 फायर टेंडर वाहन, चिखली येथील 1 फायर टेंडर वाहन, पिंपरी मुख्य अग्निशमन केंद्र येथील 2 फायर टेंडर वाहन तर थेरगाव 1 फायर टेंडर वाहन घटनास्थळी दाखल झाले. या भीषण आगीत लाकडाची वखार जळून खाक झाली आहे. तसेच एक चारचाकी देखील जळाली आहे. तर, अग्निशमन दलाच्या 40 जवानांनी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत.