अनिल ठाकरे| चंद्रपूर
पेपरमिल उद्योग समूहाच्या कळमना डेपो (Kalmana Depot) ला रविवार दुपारी 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत 4 वेगवेगळ्या डेपोपैकी 3 डेपो जळून खाक झाले. तसेच पेट्रोल पंप आणि बालाजी कन्स्ट्रक्शन कंपनीचे कार्यालय आणि वाहने या अग्नितांडवात जळून खाक झाली. तब्बल २४ तासांच्या प्रयत्नानंतर सोमवारी दुपारच्या सुमारास आग विझली. मात्र, उन्हाचा तडाखा आणि वाऱ्यामुळे पुन्हा आग लागू नये म्हणून पाण्याचा मारा करण्याचे काम अजूनही सुरूच आहे. आता आग कशामुळे लागली, हे शोधले जात आहे.
तर दुसरीकडे लागलेली आगीचे कारण आणि कामात कुठेतरी अक्ष्यम हलगर्जीपणा झाल्याचा ठपका ठेवत. याची रीतसर चौकशी करण्याची मागणी माझी वनमंत्री सुधिर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे. रविवार दुपारी 2 वाजताच्या सुमारास लागलेली आग आज सोमवार दुपारी 2 च्या सुमारास आटोक्यात आली. ही आग आटोक्यात येण्यासाठी तब्बल वाजता 24 तास लोटले. तूर्तास ही आग जरी ओसरली असली तरी मात्र, पुन्हा आगीचा भडका होऊ नये.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हयातील विविध उद्योग समूह आणि अग्निशमन दलाच्या 25 टँकर'च्या जवळपास 300 हून अधिक फेऱ्या झाल्या आहे. हे काम मंगळवापर्यंत सुरू राहणार आहे. घटनास्थळी रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, तहसीलदार, पोलिस निरीक्षक उमेश पाटील, उद्योग समूहाचे व्यवस्थापक उदय कुकडे उपस्थिती होती.
आगीचे कारण चर्चेत
स्थानिक गावकऱ्यांच्या माहितीनुसार, सकाळच्या सुमारास कळमना परिसरात जंगलातील पाला पाचोळा जाळण्यासाठी वनविभागातील कर्मचाऱ्यांनी ही आग लावली. मात्र, उन्हाचा तडाखा आणि वाऱ्यामुळे ही आग डेपो पर्यंत पोहचली. अशी माहिती प्रत्यक्षदर्शी गावकरी सांगतात.
चोराच्या उलट्या बोंबा
आग डेपोमधून जंगलाच्या दिशेने आली. यात जंगलाचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दिली आहे.
नुकसानग्रस्त :-
वनविभागाच्या अक्ष्यम कारभारामुळे हे अग्नितांडव घडून आले आहेत. त्यामुळे वनविभागाने जबाबदारी स्वीकारून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक गावकरी, पेट्रोल पंप मालक आणि बालाजी कंस्ट्रकशनचे अधिकारी यांनी केली आहे.
डेपो'तील कर्मचाऱ्यांची तत्परता
डेपो'तील कर्मचाऱ्यांनी वेळीच दखल घेतल्यामुळे जीवित हानी टळली. आगीचे रौद्र रूप पाहता दुपारपासूनच मुख्य मार्गावरची वाहतूक थांबवण्यात आली. त्यामुळे वाहनांच्या रांगाच - रांगा लागल्या. उन्हामुळे नागरिकांचे हे हाल पाहून अनेक गावातील गावकरी आणि स्थानिक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन. महामार्गावर अडकून पडलेल्या प्रवाश्यांना पाणी, उपहार आणि जेवणाची व्यवस्था केली. यामुळे प्रवाश्यांना मोठा दिलासा मिळाला. तर दुसरीकडे मात्र, चंद्रपूर - अहेरी गाडीत लहान मुले आणि महिला रात्री रस्त्याच्या कडेला आसलेल्या फुटपाठवरती विश्राम केला.