एफडीएचे आयुक्त अभिमन्यु काळे यांची तडकाफडकी बदली करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन कंपन्यांकडून उपलब्ध करण्यात अपयश आल्याने कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. काळे यांच्या उचलबांगडीनंतर परिमल सिंग यांच्याकडे सूत्र सोपवण्यात आली आहेत.
'काळेंवर कारवाई करण्याची मागणी कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये अजित पवार, नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. विलेपार्ले पोलीस स्टेशनला घडलेला प्रकार, विरोधी पक्षाचा हस्तक्षेप आणि एफडीए आयुक्त काळेंनी दिलेल्या पत्रावर कॅबिनेटमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतरच त्यांच्यावर कारवाई झाल्याची माहिती मिळत आहे.