कुणाल जमदाडे, राहुरी अहमदनगर | शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनचा लाभ घेत आपल्या कल्पकतेने शेती करत उन्नती साधली. ही प्रशंसनीय गोष्ट आहे. असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. सेंद्रिय शेती व जीआय टेक्नॉलॉजीचे ज्ञान शेतकऱ्यांनी प्राप्त केले पाहिजे. यातून शेतकऱ्यांना खूप फायदा होईल, असेही कोश्यारी म्हणाले. राहुरी कृषी विद्यापीठाच्या विविध विभागांची त्यांनी पाहणी केली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संशोधन व प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे शेतीमध्ये आधुनिकता आणता आली. त्यामुळे शेतीमध्ये उन्नती झाली असल्याचे कोश्यारी यांनी म्हटले. तसेच शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठाच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनचा लाभ घेत आपल्या कल्पकतेने शेती करत उन्नती साधली. ही प्रशंसनीय गोष्ट आहे. असे गौरवोद्गार काढत कोश्यारी म्हणाले, काळानूरूप शेतकऱ्यांनी जर शेतीबरोबर दूग्ध व्यवसाय केला तर शेती केल्याचा निश्चित फायदा होईल. शेतकऱ्यांनी सतत सकारात्मक विचार करत काम केले पाहिजे. सेंद्रिय शेती व जीआय टेक्नॉलॉजीचे ज्ञान शेतकऱ्यांनी प्राप्त केले पाहिजे. यातून शेतकऱ्यांना खूप फायदा होईल. शेतीमधील नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. 'उत्तम शेती, मध्यम उद्योग, निकृष्ट नोकरी' असे पूर्वापार पासून म्हणत होते. कोरोना काळात सर्व बंद होते. मात्र शेती चालू होती. शेतकरी शेतीत राबत होता. असे ही राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.जी.पाटील, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी अनिल पवार उपस्थित होते.