महाराष्ट्र

शेगाव-पंढरपूर महामार्गावरील पूलावर शेतकऱ्याची आत्महत्या

Published by : Lokshahi News

शेगाव ते पंढरपूर महामार्गावर असलेल्या एका पूलावर शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. निवृत्ती कारभारी पितळे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव असून तो परतूर तालुक्यातील रोहिणा बुद्रूक येथील रहिवासी आहे.

रोहिणा बुद्रूक शिवारात निवृत्ती पितळे यांची रस्त्यालगत सहा-सात एकर शेत जमीन आहे. मात्र काही जणांनी त्यातमधील दीड एकर जमीन बळकावली होती.. अनेक दिवसांपासून ते शेतजमीसाठी कचेरीच्या चकरा मारत होते. मात्र तरीही जमीनीचा काही निकाल लागत नव्हता. यासाठी निवृत्ती पितळे हे चिंताग्रस्त झाले होते. त्यामुळे त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपावल्याची शक्यता गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीनं मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी परतूर येथील सरकारी दवाखान्यात दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालात ठाकरे, पवारांसह काँग्रेसचाही नायनाट झालेला दिसेल : रामदास कदम

'जरांगेंची निवडणूक लढवण्याची पात्रता नाही' ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

Gift ideas for Diwali : दिवाळीत आपल्या प्रियजनांना द्या 'हे' गिफ्ट्स

Diwali 2024: दिवाळीमध्ये उटणे लावण्यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

'आभाळमाया', 'वादळवाट' च्या शीर्षकगीतांचा जादूगार हरपला, गीतकार आणि पटकथाकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन