महाराष्ट्र

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

Published by : Lokshahi News

रवी जैस्वाल, जालना
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्यानं घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथे घडली आहे. रामभाऊ नारायण कदम असं या शेतकर्याचं नाव असून त्यांच्याकडे दीड एकर शेतजमीन आहे. शेतात यंदा ऊस आणि कपाशीची लागवड केली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे जवळ असलेल्या गल्हाटी नदीला पूर येऊन पिकांसह शेतजमीनही खरडून गेली.

कदम हे काही दिवसांपासून नैराश्यात होते. त्यांच्यावर महाराष्ट्र बँकेचं कर्ज असल्यानं ते फेडायचं कसं या विवंचनेत ते होते. त्यामुळे रात्री घरातील पत्र्याच्या गळफास घेवून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला आहे.

Diwali 2024: फराळासाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यामध्ये असू शकते भेसळ! अशाप्रकारे ओळखा भेसळ...

MVA Press Conference: निवडणूक आयोग भाजपची बी टीम, संजय राऊतांचा निवडणूक आयोगासह सुप्रीम कोर्टावर गंभीर आरोप

दम असेल तर...; महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमधून नाना पटोलेंनी दिलं महायुतीला आव्हान

भारताची वाढती लोकसंख्या अर्थव्यवस्थेसाठी आव्हान

Israel - Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम? हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार