'विकेल ते पिकेल' या योजने अंतर्गत 'उत्पादक ते थेट ग्राहक' या योजनेच्या अंमलबजावणीसाठी 'रानभाज्या' महोत्सव राज्यात ठिकठिकाणी आयोजित केले जाते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या निर्देशाने मुंबईत (mumbai) मुलुंड येथे कृषि माल महोत्सव व विक्रीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
विविध प्रकारच्या रानभाज्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. त्या भाज्यांवर उपजीविका असलेल्या आदिवासी बांधव व शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण व्हावे. याकरिता उत्पादन घेतलेले अन्नधान्य तसेच भाजीपाला यांच्या विक्रीसाठी आणि मुलुंडमधील सर्वच नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेता यावा. यासाठी हे उपक्रम राबविले जात आहेत.
ठाण्याचे जिल्हा अधीक्षक अंकुश माने यांनी आवाहन केले की, मुलुंड (Mulund) हायस्कूल हॉल, आन्ध्र बँकेच्या जवळ, चंदन बाग रोड, पाच रस्ता, मुलुंड पश्चिम, मुंबई ४०००८० येथे २८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत रानभाज्या व कृषि माल महोत्सव व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे.