रवी जयस्वाल, जालना | ऑगस्ट महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यत राज्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन टप्प्यात मदत मिळणार असल्याची माहिती मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ऑगस्ट महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यत राज्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं राज्य सरकारनं दहा हजार कोटींचं पॅकेज जाहिर केलंय.मात्र शेतकऱ्यांना दोन टप्प्यात मदत दिली जाणार असून पहिला टप्पा हा दिवाळी आधी एनडीआरएफची मदत दिली जाणार आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात राज्य सरकारची मदत दिली जाणार असा निर्णय कॅबिनेट मिटिंग मध्ये घेण्यात आला अशी माहती टोपे यांनी दिलीये.