मेळघाटातील दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कंटाळून आत्महत्या केल्यानंतर महिलांना आपल्याच कार्यालयात कसा त्रास होतो ते स्पष्ट झाले त्यामुळे याची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे , महिलांच्या सुरक्षितेसाठी आज एका टास्क फोर्स ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैगिक शोषण तसंच त्रासाचा दखल घेण्यासाठी कार्यालयांमध्ये विशाखा समित्यांची स्थापना करण्यात येते. या समित्यांच्या कामाचा आम्ही आढावा घेत आहोत. अनेक ठिकाणी या समित्या कार्यरत आहेत मात्र प्रभावी नसल्याचे आढळून आलेले आहे.
या कमिटीवर ही दहशत असावी यासाठी टास्क फोर्स काम करेल. अनेक ठिकाणी सरप्राइज व्हिजीट आम्ही या टास्क फोर्स च्या माध्यमातून करणार आहोत. महिलांच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा आम्ही खूप गांभीर्याने घेतलेल्या असून एका ही दिपालीचा या पुढे बळी जाणार नाही यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. तुमचा आसपास अशा घटना घडत असतील तर तात्काळ त्या निदर्शनास आणा. आज विविध खात्यांचा सचिवांसोबत आम्ही उच्चस्तरीय बैठक घेतली. त्या बैठकीत टास्क फोर्स चा ही निर्णय घेण्यात आलाकारवाई सुरू झाल्या नंतर कळेलच असे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांनी सांगितले.