MMRDA Office team lokshahi
महाराष्ट्र

MMRDA कडून पावसाळ्यासाठी 24 तास आपत्कालीन नियंत्रण कक्षाची स्थापना

1 जून 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत नियंत्रण कक्ष सुरु राहणार

Published by : Shweta Chavan-Zagade

एमएमआरडीए कडून (MMRDA) पावसाळ्यासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्षाची (Emergency control room) स्थापना करण्यात आली आहे. या नियंत्रण कक्षातून एमएमआर शेत्रातील इतर सर्व सार्वजनिक व्यवस्थापनासोबत संवाद साधत आपत्कालीन परिस्थितीत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नियंत्रण कक्ष 1 जून 2022 ते 30 सप्टेंबर 2022 पर्यंत सुरू राहणार आहेत.

एमएमआरडीएच्या माध्यमातून मुंबईत विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. या ठिकाणी वाहने व पादचाऱ्यांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने या नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे पावसाळ्यात वृक्षांची पडझड पाणी साचणे वाहतूक कोंडी अशा विविध कारणांसाठी नियंत्रण कक्षाकडून नागरिकांना मदत मिळावी या हेतूने नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे पुढील चार महिन्यांच्या काळात पावसाळ्या दरम्यान जर काही समस्या उद्भवल्यास 022- 26 591241, 022- 265 94 176, 86 57 40 20 90 आणि 1800 22 80 1 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन एमएमआरडीएकडून करण्यात आले आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय