महाराष्ट्र

पूरग्रस्त भागात आणखी १० दिवस ‘अंधार’, टॉवर कोसळल्याने वीजपुरवठा खंडीत

Published by : Lokshahi News

पूरग्रस्‍त महाड आणि पोलादपूरकरांना पुढचे आणखी दहा दिवस तरी अंधारात काढावे लागणार आहेत. महापारेषणच्‍या अतिउच्‍चदाब वाहिनीचे दोन टॉवर्स अतिवृष्‍टीत कोसळल्‍यामुळे या दोन्‍ही तालुक्‍यांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे. 

महाड अति उच्चदाब उपकेंद्र बंद असल्यामुळे चांभारखिंड, जी. बी. एल, कोळोसे व तुर्भे हे चार स्विचिंग उपकेंद्र बंद पडले आहेत.  260 गावातील तब्‍बल 80 हजार ग्राहकांना याचा फटका बसलाय. त्‍यामुळे पूरातून बाहेर पडलेल्‍या महाड पोलादपूर करांना अंधारात रात्र काढावी लागत आहे. शिवाय मोबाईल संपर्क व पिण्‍याच्‍या पाण्‍याची मोठी समस्‍या निर्माण झाली आहे. जो पर्यंत अतिउच्‍चदाब टॉवर लाईनचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होऊ शकत नाही.

त्‍यासाठी जवळपास 350 कर्मचारी काम करीत आहेत. तात्‍पुरत्‍या स्‍वरुपात गोरेगाव फीडरवरून काही गावांना वीजपुरवठा करण्‍याचा महावितरणचा प्रयत्‍न सुरू आहे. दुसरीकडे महावितरणने ग्राहकांना धोक्‍याचा इशाराही दिलाय. पुरामुळे वीजवाहिन्‍या, वायरींग तसेच मीटरमध्‍ये पाणी गेल्‍याने ते खराब झाले आहेत. त्‍यामुळे नागरीकांनी लगेच त्‍याचा वापर करू नये, फ्रीज, टीव्‍ही, वॉशिंग मशीन्‍स वापरू नयेत असं आवाहन महावितरणने केले आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती